|
| विमा कंपन्यांना नवी शिस्त |
विमा कंपन्यांना तिमाही कामगिरी जाहीर करावी लागणार आहे. ही माहिती कोणत्या पद्धतीने जाहीर करायची याबाबतचा फॉरमॅट ठरविण्यासाठी डीलॉइट फर्मची सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात येणार आहे, अशी माहिती विमा नियंत्रक असलेल्या 'इर्डा'चे सदस्य आर. के. नायर यांनी म्हटले आहे.
डीलॉइटने फॉरमॅट तयार करण्याचे काम हाती घेतले आहे. या फॉरमॅटमधील माहिती कंपन्यांना भरावी लागेल.
आयपीओ'साठी नियम
मा कंपन्यांच्या 'आयपीओ'साठी मार्गदर्शन प्रणालीही तयार करण्यात आली असून मंजुरीसाठी ती 'सेबी'कडे पाठविण्यात आली आहे. 'सेबी'कडून ती 'इर्डा'कडे परत आलेली नाही, असे नायर यांनी स्पष्ट केले. विमा उद्योगासाठी विलिनीकरण आणि ताब्यात घेण्याचे धोरणही निश्चित करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. Ref :- http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/6073225.cms |