|
नव्या पॉलिसीच्या विक्रीत घट सेबी - इर्डातील वादाचा लाइफ इन्शुरन्स कंपन्यांना फटका गेल्या आर्थिक वर्षात बिर्ला सनलाइफ , मेटलाइफ आणिएसबीआय लाइफ यांच्या नव्यालाइफ इन्शुरन्स पॉलिसीच्याविक्रीत मोठी घट झाली आहे .मात्र , त्यांच्या ग्राहकांनीइन्शुरन्स पॉलिसीचे मूल्यवाढविल्याने कंपन्यांच्याप्रिमियममध्ये वाढ झाली आहे .
गेल्या आर्थिक वर्षात नव्या लाइफइन्शुरन्स पॉलिसीच्या विक्रीत १० टक्के घट झाली असून , ४ . ८ कोटी पॉलिसीविकल्या गेल्याचे विमा नियामक आणि विकास प्राधिकरणाने ( इर्डा ) जाहीर केले .कंपन्यांच्या म्हणण्यानुसार सेबी आणि इर्डामधील वादामुळे हा फटका बसला आहे .
भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या ( एलआयसी ) पॉलिसी विक्रीत गेल्या आर्थिकवर्षाच्या तुलनेत पाच टक्के घट , तर लाइफ इन्शुरन्स क्षेत्रातील खासगी कंपन्यांच्यापॉलिसी विक्रीत २३ टक्के घट नोंदली गेली आहे . ' रेग्युलर प्रिमियम पॉलिसीचाव्यवसाय लक्षात घेतल्यास या क्षेत्राची वाढ २० टक्क्यांहून अधिक झाली आहे . याआधी विकण्यात येणाऱ्या पॉलिसी या योग्य नव्हत्या . आता सल्लागार आणि एजंटत्यांची विक्री करण्यास इच्छुक नाहीत ,' असे एचडीएफसी लाइफचे व्यवस्थापकीयसंचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी अमिताभ चौधरी म्हणाले .
' युनिट लिंक्ड पॉलिसी ' च्या ( युलिप ) नियमनावरून इर्डा आणि सिक्युरिटीज अँडएक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया ( सेबी ) यांच्यात गेल्या आर्थिक वर्षात मोठा वाद झालाहोता . याच काळात काही पॉलिसीवर मिळणारे कमिशन कमी झाल्याने अशाप्रकारच्या पॉलिसी विकण्यास एजंट इच्छुक नव्हते . त्याचा फटका इन्शुरन्स उद्योगालागेल्या आर्थिक वर्षात मोठा बसला . इर्डाने काही पॉलिसीबाबत तसेच वितरणाबाबतीलकाही नये नियम लागू केले . परिणामी कंपन्यांना एजंटना त्यासाठी प्रशिक्षण देण्यासाठीकमी वेळ हातात होता . त्यामुळे कंपन्या नव्या पॉलिसी बाजारात आणण्यास यशस्वीठरल्या नाहीत .
पॉलिसीच्या मुल्यात वाढ झाल्याने पॉलिसीच्या विक्रीत गेल्या आर्थिक वर्षात घटहोऊनही प्रीमियमच्या उत्पन्नात १५ टक्के वाढ झाली . इन्शुरन्स क्षेत्रातील खासगीकंपन्यांना या सगळ््याचा मोठा फटका बसला . मात्र , व्यवसायात मोठी घटहोण्यासपासून रोखण्यास एलआयसी यशस्वी ठरली . ' आमच्या पारंपरिकपॉलिसीमुळे वाढ होण्यास मदत झाली . मात्र , ती गेल्या वर्षाच्या तुलनेत मंदावलीआहे ,' असे एलआयसीचे व्यवस्थापकीय संचालक डी . के . मेहरोत्रा यांनी सांगितले .युलिपकडे ग्राहक गुंतवणुकीचा पर्याय म्हणून पाहतात . बाजारातील अस्थिरतेमुळेजोखीम नको असल्याने यासाठी त्यांनी गुंतवणुकीस सुरक्षित असणारा ठेवीचा प्रकारनिवडला असे ते म्हणाले .
पारंपरिक इन्शुरन्स पॉलिसीच्या विक्रीत वाढ झाल्याने एलआयसीला नव्याव्यवसायातून मिळणाऱ्या उत्पन्नात २२ टक्के वाढ झाली . सेबी आणि इर्डा यांच्यातीलयुलिपवरून पेटलेल्या वादामुळे गेल्या आर्थिक वर्षाच्या मध्यात युलिपशी संबंधितनियमांत बदल करण्यात आले . त्यामुळे युलिपच्या विक्रीवर परिणाम झाला , असेकंपन्यांनी सांगितले . ----
प्रीमियम उत्पन्नाची तुलना इन्शुरन्स कंपनी २००९ - १० २०१० - ११ बदल ( टक्क्यांत ) एलआयसी ७० , ८९१ ८६ , ४४५ २१ आयसीआयसीआय प्रुडेंशियल ६३३४ ७८६० २४ एसबीआय लाइफ ७०४० ७५७० ७ एचडीएफसी लाइफ ३२६१ ४०६५ |